ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेत शिवारात वाघाचे दर्शन ; वाघाला जेरबंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी

धान कापणी प्रभावित ; किसाननगर आणि कोंडेखल परिसरात वाघाचे दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

    तालुक्यातील कोंडेकल किसान परिसरातील शेत शिवारात वाघाच्या पेजमार्ग आढळले त्यामुळे शेतकरी वर्गात आणि शेतमजुरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे तालुक्यात भातचे पीक कपनिकरिता आल्याने शेतकरी धान कापणी करिता शेतात गेले असता मोठ्या वाघाचे पाऊल खुणा दिसून आल्या त्यामुळे परिसरात शेतकरी भयभीत झाले आहेत.

शेतातील धान कापणी व कपाशीचे काढणी कसे करायचे या चिंतेत शेतकरी सापडला आहे वाघाच्या हल्ल्यात जीवित हानी झाल्यास याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न यावेळी शेतकरी व शेतमजूर करीत आहेत वन विभागाने पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत तालुक्यातील कोंधेखल व किसान नगर या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती जमीन जंगल परिसर ला लागून आहे.

वन्यप्रांचा अधिवास या परिसरात नेहमीच असतो यामुळे शिकारीच्या शोधात असणारे वाघ बिबट रान डुक्कर सारखे प्राणी संपूर्ण जंगल परिसर पिळून काढीतअसतात अनेकदा जंगलाबाहेर मानव रहिवासी असलेल्या वस्तीतील परिसरात देखील येतात त्यामुळे मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडतात सध्या धनांचे पीक परिपक झाल्याने कापिला आले आहेत शेतातील कपाशीचे पीक काढणीला आले आहे मोठ्या पट्टेदार वाघाचे शेतात पाऊल खून आढळून आले आहेत शेतात आलेले मजूर घरी निघून जात आहेत असेच परिस्थिती कायमचे राहिल्यास भात पीक काढणीला उशीर होण्याची शक्यता आहे शेतात सोडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडात आलेला घास निघून जाईल.

यामुळे या परिसरात वन विभागाने चे अधिकारी कर्मचारी पिंजरे लावून पट्टेदार वाघाला पकडण्यासाठी यशस्वी मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे परंतु सावली येथील वन अधिकारी याबाबत निष्क्रिय आहेत असेही शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये