ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे येथील आंतरराष्ट्रीय अबकस आणि माणसीक अंकगणीत स्पर्धेत भद्रावती येथील विद्यार्थ्यांचे सुयश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्मार्ट किड अबाकस लर्निंग प्रा.ली.यांचे तर्फ पुणे येथे २८ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आणी आंतरराष्ट्रीय अबकस आणी मानसिक अंकगणित स्पर्धेत भद्रावती शहरातील विद्यार्थ्यांनी ऊल्लेखणीय यश मिळवीत शहराचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत अन् अनील भागवत कैटेगिरी बी मधे पहिला,मनस्वी आसुटकर ही कैटागिरी ए मधे पहिली तर भावी मंगेश डाखरे कैटागिरी बी मधे दुसरी आलेली आहे.त्यांना ट्राफी देऊन गौरविण्यात आले आहे.
याशिवाय हर्ष आसुटकर,कृष्णा सुभाष दुनाले,श्रीया सुहास कहुरके व अंश रविंद्र पिंपळकर या विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत यश प्राप्त केले आहे.त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.या सर्व विद्यार्थ्यांचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.



