भुरियेसापूर येथे विहिरीत आढळला कबड्डी खेळाडूचा मृतदेह
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिवती तालुक्यातील भुरियेसापूर येथील युवा कबड्डी खेळाडू गोपीनाथ भीमराव कोडापे (२०) याच्या हत्येचा धक्कादायक प्रकार ३१ डिसेंबर रोजी उजेडात आला.२५ डिसेंबर पासून बेपत्ता असलेल्या या तरुणाचा मृतदेह गावाजवळील विहिरीत आढळून आला.विशेष म्हणजे तरुणाच्या कंबरेला दगड बांधलेला आढळल्यामुळे हत्येचा स्पष्ट संशय निर्माण झाला आहे.
सदर घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी ग्रामस्थानी पोहोचून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.मृत युवक गोपीनाथ गावातील प्रसिद्ध कबड्डी खेळाडू होता.तो स्थानिक स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेत होता.हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.मात्र वैयक्तिक वैमनस्य किंवा इतर कारणामुळे ही घटना घडली असावी,असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.जिवती पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.प्रकरणाचा तपास सुरू असून,पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.गावकऱ्यांनी न्यायाची मागणी करीत लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



