भद्रावती येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला अपघाताचे सत्र
नागपूर-चंद्रपूर जमघट रेस्टॉरंट जवळील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अनाधिकृत पार्कींग : वाहतूक विभागाचे दुर्लक्ष्य
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे दिनांक ३१ रोजी रात्री वरोरा येथून चंद्रपूर कडे जात6 असलेल्या वाहन चालकाने निष्काळजीपणे व मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांना ठोस मारल्याने वाहने क्षतिग्रस्त झाली. नागपूर ते चंद्रपूर या राजमार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते व मानोरा फाटा हा वर्तुळ lकार असल्याने6 इथे अपघाताची शक्यता अधिक असते. पुरेशी पार्किंग सुविधा नसल्याने प्रवासी अनधिकृतपणे रोडलगत वाहने उभी करतात. यावर पोलिस विभागाचा कोणताही अंकुश नसल्याचे बोलल्या जात आहे.
अपघात भीषण होता मात्र दैवयोगाने जीवितहानी झाली नाही. भद्रावती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा करून मद्यधुंद चालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
या वर्दळीच्या रस्त्यालगत सर्विस रोड असावा अशी कित्येक दिवसाच्या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखविली असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.



