ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्री क्षेत्र अंभोरा जवळ अध्यात्म व विज्ञान यांचा संगम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नागपूर जवळील श्री क्षेत्र अंभोरा येथे पाच नद्यांचा संगम असून या ठिकाणी श्री चैतन्य ईश्वर महादेव यांची स्वयंभू प्रगट झालेली पिंड असून अतिशय पवित्र व नयनरम्य ठिकाण आहे येथील पाच नद्यांच्या संगम व गोसीखुर्द धरणाचे पाणी येथे नागपूर चंद्रपूर रोडवर बांधलेला आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेला पूल असून हे क्षेत्र म्हणजे अध्यात्म व विज्ञान यांचा संगम आहे.
या ठिकाणी अनेक भाविक जाऊन श्री चैतन्य ईश्वर महादेवांचे दर्शन घेऊन हा विज्ञानाचा चमत्कार पाहत आहे, येथील वैशिष्ट्य म्हणजे मराठीचे आद्यकवी श्री मुकुंदराज यांनी मराठीतील आद्य ग्रंथ विवेक सिंधू व अन्य ग्रंथ या ठिकाणी बाराव्या शतकात लिहून पूर्ण केले आहेत.



