ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वांगीण विकास हाच भाजपा सरकारचा मूलमंत्र – आमदार देवराव भोंगळे

नांदाफाटा येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी धरली भाजपची वाट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना : राजुरा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा आणि जनकल्याण हे आमचे मुख्य ध्येय असून गावोगावी रस्ते पाणीपुरवठा ,आरोग्य,शिक्षण यासारख्या मूलभूत मूलभूत सोयीसुविधा पोहचविणे ही आमची प्राथमिकता आहे. शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचवून विकासकामे अधिक जलदगतीने पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांगीण विकास हाच भाजपा सरकारचा मूलमंत्र असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

कोरपना तालुक्यातील नांदाफाटा येथे काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून (दि.२८)भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी ते बोलत होते.

आमदार देवराव भोंगळे पुढे म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात विकासकामांना गती देण्यात आली आहे. नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून त्या सोडवण्यासाठी ठोस निर्णय घेतले जात आहे. शासनाच्या सर्व योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपा सरकार सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी आमदार भोंगळे यांनी दिली.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार,राजुरा शहर महामंत्री सचिन भोयर, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे,अरुण रागीट,नगरसेवक सतीश बेतावार, सुरेश मेश्राम,नगरसेविका शीतल धोटे,संगीता गाऊत्रे,संगीता मुसळे,भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,ओम पवार,महेश घरोटे,जगदीश पिंपळकर, रवी बंडीवार, प्रमोद कोडापे,आनंदराव निब्रड, बंडू वरारकर,रामदास पानघाटे, विठ्ठल हिरादेवे,संजय नित,मनोहर चव्हाण,कैलास ताकसांडे,यांचेसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये