तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत उज्वल रॉय यांच्या प्रतिकृतिला प्रथम क्रमांक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती,कोरपना द्वारा आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी दिनांक 23, 24 व 25 डिसेंबर रोजी प्रतिभा पाटील माध्यमिक आश्रम शाळा धानोली तांडा येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचलित महात्मा गांधी विद्यालय तथा उच्चमाध्यमिक विद्यालय,गडचांदूर येथील गणित- विज्ञान शिक्षक श्री प्रशांत धाबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उज्वल कुमार रवींद्र राय,इयत्ता नववी या विद्यार्थ्यांनी विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM या मुख्य विषयांतर्गत रेल्वे अपघात नियंत्रण प्रणाली यावर आधारित प्रतिकृती सादर केली त्या प्रतिकृतीला तालुका स्तरावरील गैर आदिवासी गटातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच प्रथम संतोष चौधरी इयत्ता सातवी या विद्यार्थ्याने कचरा व्यवस्थापन प्रणाली प्रतिकृती सादर केली त्याला उच्च प्राथमिक गैर आदिवासी गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा सर्वपदाधिकारी, मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षिका व सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



