ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वामनराव गड्डमवारांची नाळ शेतीच्या मातीशी – जुडली होती : आमदार विजय वडेट्टीवार

कार्यक्रमाला असंख्य शेतकरी उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

स्वर्गीय वामनराव पाटील गड्डमवार हे एक प्रगतिशील शेतकरी होते.त्यामुळे ते राज्य वनमंत्री असताना नेहमी विधिमंडळातील सभागृहात शेतकऱ्यांन विषयावर नेहमी चर्चा करीत असत.परंतु आज विधिमंडळ सभागृहात बदलाची चर्चा सुरू होते.एवढा बदल या महायुती सरकारने केला आहे.पहिले शेती ही शेतकऱ्यांची होती.आज श्रीमंतांची शेती झाली आहे.शेतकऱ्यांना उत्पादनासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूचा दर वाढला आहे. रासायनिक खताचे,बी बियाणांचे,कीटकनाशके व बुरशीनाशकांचे वाजवीपेक्षा भाववाढ झाल्याने गरीब शेतकऱ्यांना परवडत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे.असे प्रतिपादन विजय वडेट्टीवार, आमदार यांनी शेतकरी मेळाव्या, कृषी प्रदर्शनी व प्रगतिशील शेतकरी सन्मान सोहळ्यात प्रसंगी बोलत होते.

    हा कार्यक्रम विश्वशांती कला वाणिज्य महाविद्यालयातील भव्य पटांगणात आयोजित कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला मंचावर उपस्थित विजय वडेट्टीवार आमदार तथा विधिमंडळ गट नेते, सुधाकर अडबले आमदार विधानपरिषद, अभिजितवंजारी आमदार विधानपरिषद, संदीप गड्डमवार भारत शिक्षन प्रसारक मंडळ अध्यक्ष तथा संचालक जिल्हामध्यवर्ती बँक, राजबाळ संगीडवार सचिव, साधना वाढई नगराध्यक्षा,डॉ.सुरेश महाकुळकर,नंदू नागरकर,ऍड.राम मेश्राम, अनिल शिंदे,नंदा अल्लूरवार,सुशीला गड्डमवार,सुभाष गौर,विनायक बांगडे,उषा भोयर तालुका कांग्रेस महिला अध्यक्ष, ज्योती शृंगारपवार, तसेच स्व.वामनराव गड्डमवार स्मृती प्रतिष्ठानाचे पदाधिकारीआदी मंडळी होती.

    पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे.नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आत्महत्या सारखे पाऊल उचलावे लागत आहे. संपूर्ण शेतकरी कर्जाच्या खाईत गेला आहे.त्यांना आत्मसन्मानाने जीवन जगता यावे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.कर्ज माफी करण्यासाठी मी सरकारला भाग पाडीन.मला कष्ट भोगावे लागले तरी चालेल असेही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.पुढे बोलताना म्हणाले की कांग्रेसच्या विचार धारेशी आमची नाळ जुडली आहे.गांधी,नेहरू, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे.आताच्या परिस्थितीतुन शेतकऱ्यांना सावरण्यासाठी कर्ज माफी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

  संदीप गद्दमवार यांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे यावर प्रस्तावित भाषणात बोलत होते. तसेच उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय वामनराव पाटील गड्डमवार यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. शेतकऱ्यांची खरी मुहूर्तमेढ रोखण्याचे काम स्व.वामनराव पाटील गड्डमवार यांनी खऱ्या अर्थाने केले आहे असे अनेक मान्यवरांनी उद्धगार काढले आहे.

कार्यक्रमाचे संचालन संजय पडोळे,राजू केदार, आभारप्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक रवल गड्डमवार यांनी केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये