ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी नेते बच्चू कडू यांची महिलांच्या उपोषण स्थळाला भेट

आम्ही पाणी मागतोय सोनं मागत नाही _ बच्चू कडू 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

काही करा आजच्या आज निर्णय घेऊन कॅनलला पाणी सोडा _ बच्चू कडू

गोसीखुर्द प्रकल्पांच्या उजव्या कालव्याचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी सोडण्यात यावे या मागणीला घेऊन खेड येथील सरपंच दीक्षा भजनकर यांच्या नेतृत्वात सायघाटा येथे उपोषणाच्या माध्यमातून महिलांचा लढा पाच दिवसानंतर गोसीखुर्द प्रकल्पाच्या सायघाटा येथील कार्यालयासमोर सुरूच आहे.

     शनिवार दिनांक २० डिसेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते बच्चू कडू नागभीड तालुक्यातील दौऱ्यावर आले होते. त्यांना उपोषण संदर्भात माहिती कळताच त्यांनी सायघाटा येथील गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालवा कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयासमोरील महिलांच्या उपोषण स्थळी भेट घेऊन पाठिंबा दर्शवत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत पाण्यासंदर्भात भ्रमणध्वनीद्वारे विस्तृत चर्चा करून ताबडतोब पाणी सोडण्याचे निर्देश करावेत. असे अल्टीमेटम दिले आहे. याप्रसंगी कार्यकारी अभियंता संदीप हासे यांना चांगले धारेवर धरले. आपन स्वतः पुढाकार घेऊन आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ पाणी देण्याचे आदेश करावेत.

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे. याप्रसंगी भारतीय कम्युनिस पक्षाचे नेते काँ. विनोद झोडगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सुरज तलमले, शिवसेना (ऊबाठा) तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बगमारे, शिवसेना ऊबाठा उपजिल्हाप्रमुख अमृत नखाते, शिंदे शिवसेना नेते तथा चंद्रपूर उपजिल्हाप्रमुख संजय पारटवार, शिंन्दे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नरेंद्र नरड, यांच्यासह बहुसंख्य महिला पुरुष शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये