ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदा येथे माजी विद्यार्थी संघ स्थापना/संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नांदा येथील श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 20 डिसेंबर २०२५ रोजी माजी विद्यार्थी संघ स्थापना तसेच संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी चा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल जी मुसळे होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे लिपिक सुनील मुसळे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद उपस्थित होती. आपल्या अध्यक्ष भाषणात प्राचार्य अनिल मुसळे सर यांनी संत गाडगेबाबा यांनी केलेल्या महान कार्याचा उल्लेख केला तसेच संत गाडगे महाराजांनी आपल्या जीवनात स्वच्छतेला प्राथमिक महत्त्व दिले.

त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघ स्थापन करणे हा उपक्रम शाळेचा दर्जा उंचावण्यासाठी खूप मोलाचा संघ आहे. माझी विद्यार्थी संघ जर मजबूत असेल तर शाळेचा व कॉलेजचा दर्जा उंचावेल. अशाप्रकारे त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व तुम्हाला नवनवीन उपक्रम घेण्याकरिता शाळेकडून जे काही मदत हवी असेल ते देण्याकरिता मी तत्पर आहोत असे आश्वासन दिले . असे मत डॉक्टर अनिलजी मुसळे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर प्राध्यापिका विरुटकर मॅडम प्राध्यापक लालसरे सर यांनी सुद्धा योग्य मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका नीता मुसळे यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापिका संगीता बल्की आणि आभार प्राध्यापिका जमदाडे मॅडम यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा महाविद्यालय नांदा येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये