मोटरसायकल चोरीचा गुन्हा केला उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे तक्रारदार मनोज नागोराव तराळे राहणार डेहनकर लेआउट वर्धा यांची मोटरसायकल पोलीस स्टेशन वर्धा शहर परिसरातून दि.03/12/2025 रोजी ते पेंट घेणे करता फिदा हुसेन दुकान, गोल बाजार वर्धा येथे गेले व त्यांनी त्यांची मोटरसायकल दुकानाबाहेर उभी केली असता ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली अशा त्यांच्या तक्रारीवरून पोस्टला गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्याच्या तपासात आम्ही पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, पोलीस अंमलदार वैभव जाधव, श्रावण पवार पोलीस स्टेशन वर्धा शहर असे पोस्ट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना खास मुखबीर कडून माहिती मिळाली की, आनंद नगर वर्धा येथे राहणारा अमन तिरमिले याने काही दिवसापूर्वी वर्धा शहर परिसरातून एक मोटर सायकल चोरी केली आहे.
त्यावरून त्याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन कसून विचारपूस केली असता त्याने गोल बाजार वर्धा परिसरातून एका पेंटचे दुकानासमोरून गेल्या 10 ते 12 दिवसापूर्वी एक मोटरसायकल चोरी केली असून तिचे पेट्रोल संपल्याने ती मोटारसायकल आरोपी अमन किसन तीरमिले वय 19 वर्ष राहणार आनंदनगर वर्धा याने बुनियादी शाळेच्या मागे रेल्वे पटरी च्या बाजूला आनंद नगर परिसरात उभी ठेवली आहे वरून त्याचे जवळून एक मोटर सायकल हिरो स्प्लेंडर प्लस डब्ल्यू MH 32 Z 7663 कि. 35,000 रुपये माल जप्त करण्यात आला सदरची कारवाई हि माननीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन सर,अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा विभाग प्रमोद मकेश्वर सर यांच्या निर्देशाप्रमाणे मा.पोलीस निरीक्षक संतोष ताले ठाणेदार पोलीस स्टेशन वर्धा शहर, यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पोउनि शरद गायकवाड, गुन्हे प्रगटीकरणपथकाचे पोलीस हवालदार प्रशांत वंजारी, पोलीस हवालदार नरेंद्र कांबळे, पोलीस शिपाई वैभव जाधव, श्रावण पवार, सर्व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रशांत वंजारी पोलीस स्टेशन वर्धा शहर हे करीत आहे



