ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉली व रेतीसह एकुण१८ लाख १८ हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि. १९/१२/२०२५ रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक मा. पोलीस निरीक्षक सा. स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांचे आदेशाने उप विभाग हिंगणघाट परीसरात अवैध्य व्यवसायावर कार्यवाही करने करीता पेट्रोलींग करीत असतांना दोन लाल रंगाचे महिन्द्रा कंपणीचे ट्रॅक्टर बोरगांव शिवारात बोरगांव घाटातील रेतीची (गौणखनिज) चोरी करून मांडगांव रोडने हिंगणघाट कडे येत आहे.

अशा मिळालेल्या मुखबीरच्या खबरेवरून यातील रेती (गौणखनिज) ची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर सापळा रचुन कार्यवाही केली असता सदर ट्रॅक्टर १) ट्रॅक्टर नंबर एम एच ३४ ए पी ४६०९ चा चालक नामे रूपेश प्रकाशराव टोंगे, वय २४ वर्षे, रा. कोपरा, त. हिंगणघाट, जि. वर्धा २) ट्रॅक्टर नंबर एम एच ३४ ए पी ४६०९ चे मालक प्रशांत देवीदास वानखेडे, रा. बोरगांव, त. हिंगणघाट (पसार) ३) कमांक नसलेला ट्रॅक्टर चा चालक नामे लक्ष्मण मधुकर घुसे, वय २४ वर्षे, रा. वाघोली, त. हिंगणघाट, जि. वर्धा ४) कमांक नसलेला ट्रॅक्टर चा मालक नाव चंद्रकांत तुकारामजी रिठे, रा. डाग, त. हिंगणघाट (पसार) दोन्हीही ट्रॅक्टरचे ट्रॉलीची पंचा समक्ष पाहणी केली असता त्यात ओली काळी रेती (गोणखनिज) भरून असल्याचे दिसुन आले. त्यांना रेती वाहतुकीचा परवाना, रॉयल्टी मागितले असता त्यांचेकडे कुठलाही वाहतुकीचा पास परवाना नसल्याचे सांगितले.

सदरच्या ट्रॅक्टर मध्ये असलेली रेती ही शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या वेणा नदी पात्रातुन चोरून आणल्याचे सांगीतले. तरी सदर आरोपी संगणमताने त्यांचे स्वतःचे आर्थीक फायदयाकरीता शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या मांडगांव ते डाग रोडवर बोरगांवकडे जाणाऱ्या फाट्याजवळ वेणा नदीचे पात्रातुन रेतीची (गौणखनिज) चोरी करून, वाहतुक केल्याचे निष्पन्न झाल्याने, पंचासमक्ष मौकाजप्ती पंचनामा प्रमाणे कार्यवाही करून आरोपीचे ताब्यातुन वरील नमुद वर्णनाचा जु. किं. १८,१८,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपी कमांक ०१ च ०३ याचे विरूध्द पो.स्टे. हिंगणघाट येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.

-सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनि. ओमप्रकाश नागापुरे, पो.हवा. अमर लाखे, धमेंद्र अकाली, अमरदिप पाटील, पवन पन्नासे, पो.अं. रितेश कुन्हाडकर सर्व नेमणुक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा. यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये