देवालय सोसायटीतील घरफोडीचा आरोपी दोन दिवसात पोलीसांच्या ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील विंजासन परीसरातील देवालय सोसायटीत घरफोडी करुन घरातील तिन लाख रुपये व दिड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट लांबविणाऱ्या आरोपीस भद्रावती पोलीसांनी अवघ्या दोन दिवसात बेड्या ठोकुन अटक केली आहे. बंटी सुभाषचंद्र भद्रा,वय ४४ वर्ष, राहणार खापरखेडा,नागपूर असे या आरोपीचे नाव असुन त्याच्याकडून सोन्याचे ब्रेसलेट व रोख ५० हजार रुपये हस्तगत केले आहे.उर्वरीत तिन लाखाची रक्कम आपल्या बैंकखात्यात जमा केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.देवालय सोसायटीत राहणारे तनुज पंडीले हे आपल्या कुटुंबासह दिनांक १८ ला यवतमाळ येथे लग्न सोहळ्यासाठी गेले असता सदर आरोपीने त्यांचे घर फोडून घरातील साडेतीन लाख रुपये रोख व दिड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट लांबविले होते.लग्न आटोपुन घरी परत आल्यानंतर पंडीले यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.त्यानंतर त्यांनी घटनेची तक्रार भद्रावती पोलीसात केली होती.
पोलीसांनी या प्रकाराची दखल घेत आपली तपासयंत्रना राबवित आरोपीला अवघ्या दोन दिवसात सदर आरोपीला अटक केली.सदर कारवाई ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात संजय मिश्रा,गजानन तुपकर,महेंद्र बेसरकर,अनुप आस्टुनकर,विश्वनाथ चुदरी,गोपाल आतकुलवार,जगदीश झाडे,संतोष राठोड, खुशाल कावळे,योगेश घाटोळे व प्रेम बावणकर यांनी केली.



