Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या दिनदर्शिकेचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते प्रकाशन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 शिक्षक विद्यार्थ्यांची उचित जडणघडण करून देशाचे भवितव्य मजबूत करत असतात.शिक्षक समाजाला दिशा देणारा समाजातील अतिशय जबाबदार घटक आहे.असे असताना आजही शिक्षणक्षेत्र अनेक समस्यांनी ग्रस्त आहे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.आमदार म्हणून मी सदैव शिक्षकांच्या पाठीशी उभा आहे तर शैक्षणिक उन्नतीसाठी मी सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार श्री सिद्धार्थ खरात यांनी केले.

      स्वराज्य जननी आईसाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाच्या सुवर्णपर्वावर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे श्री.सिद्धार्थ खरात,एम.पी.एस.सी.च्या सचिव सुवर्णा खरात,अंकुर फाउंडेशन संभाजीनगरचे श्री गोविंद गोंडे पाटील,उत्कर्ष फाऊंडेशनचे सचिव श्री. गंगाधर खरात,सौ.द्वारका खरात,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष रामदास गुरव,जिल्हा कोषाध्यक्ष वनश्री जनाबापू मेहेत्रे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बिल्लोरे,प्राध्यापक संदीप अचलखांब,रामदास कहाळे,मुशीर खान कोटकर,सागर मेहेत्रे,उमेश खरात आदींची उपस्थिती होती.

   दिनदर्शिका प्रकाशनाच्या निमित्ताने श्री खरात यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या संदर्भाने अधिक ची माहिती जाणून घेतली तर शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांचा क्ट निपटारा कसा करता येईल या अनुषंगाने शिक्षकांसोबत संवाद साधला व शिक्षण क्षेत्र समस्या मुक्त करण्यासाठी शिक्षकांनी सुद्धा आवाज उठविण्याचे आवाहन श्री खरात यांनी केले.

उत्कृष्ट दिनदर्शिकाचे प्रकाशन केल्याबद्दल विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ बुलढाणा जिल्ह्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख व सहकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी अभिनंदन केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये