ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देश सेवेसाठी निघालेल्या जवानांचे सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- १८ आक्टोबर ला तालुक्यातील देवलागुडा येथील वसंत शंकर राठोड यांचा मुलगा योगेश व गणेश शंकर जाधव यांचा मुलगा परमेश्वर यांनी शेतमजुरी करून आपल्या मुलांना देश सेवेसाठी पाठविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.योगेश व प्रमेश्वर यांचे प्राथमिक शिक्षण जिवती येथे झाले असुन महाविद्यालयीन शिक्षण राजुरा येथील शिवाजी महाविद्यालय येथे पूर्ण केले घरची हलाकीची परिस्थिती असल्याने त्यांची देशसेवा करण्याची आवड असल्याने जिद्द व मेहनतीच्या जोरावर त्यांची अग्नि्वीर म्हणून निवड झाल्याने राजुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असलेले दत्ता बालू चव्हाण यांनी त्यांचा सहपरिवारा सह सत्कार केला.

दत्ता चव्हाण हे गावातील मुलांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात स्वतः पुढाकार घेऊन गावातील मुलासाठी वाचणाची आवड निर्माण व्हावी म्हणून गावात गावाकऱ्याच मदतीने वाचनालय सुरु केले हळू हळू मुलांना वाचनाची सवय लागली व आज घडीला एका छोटयाशा गावातून ३० च्या वर मुले -मुली नोकरीला आहेत. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे दरवर्षी नोकरीला लागणाऱ्या बांधवाचे दत्ता चव्हाण यांनी आवर्जून सत्कार करीत असतात.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये