अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने MRP कमी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन
निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक १२ जून २०२६ रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने MRP कमी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर वर्धा यांना निवेदन देण्यात आले असून आमच्या मागण्या खालील प्रमाणे आहेत उत्पादन खर्चावर आधारित वस्तूंची किरकोळ MRP किंमत उदाहरण मेडीसीन शेती औषधी अवजारे इत्यादी एक देश एक MRP किरकोळ किंमत फसव्या जाहिरातीवर बंदी व इतर किंमतीच्या माध्यमातून ग्राहकांची होत असलेली लुट थांबविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर वर्धा यांना हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

यावेळी निदेवन देताना उपस्थित असलेले किशोर मुटे सतिश देशमुख विनोद पोटे विभा देशमुख कल्याणी मुटे उत्तम सावरकर त्र्यंबक पुष्पलवार जनकजी पालीवाल भाऊराव कोठकर प्रफुल्ल क्षिरसागर नंदू नेरोटे सुरेश भंडागे प्रणिता कश्यप इत्यादी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते…


