ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लेखक आणि विद्यार्थ्यांचा थेट संवाद

विकास विद्यालयात लेखक आपल्या भेटीला उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

लोकसेवा मंडळ विहीरगाव द्वारा संचालित विकास विद्यालय तथा विकास कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव ता सावली जि चंद्रपूर येथे दिनांक 8 डिसेंबर 2025 रोज सोमवारला भाषा समृद्धीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीकरिता महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक विज्ञान कथा लेखक वर्ग दहावीच्या निर्णय पाठाचे लेखक डॉ. सुनील विभुते सर प्रमुख वक्ते म्हणून मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला अध्यक्षा प्राचार्या कु. गराटे मॅडम तर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला श्री विकास पुरेल्लीवर सर यांनी लेखकांचा परिचय दिला. डॉ गावंडे सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. अक्षरा अलाम कृतिका गेडाम वर्ग दहावा या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. श्री मोटघरे सर, श्री चावरे सर कु. बोबाटे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख वक्ते डॉक्टर सुनील विभुते सर यांनी विविध शास्त्रज्ञांच्या छोट्या-मोठ्या शोधांच्या कथा सांगितल्या. हे विद्यार्थी मनोमन ऐकत होते.

छोटे छोटे शोध कसे लागले. शास्त्रज्ञ कसे तयार झाले. याही संदर्भात सरांनी मार्गदर्शन केले वर्ग दहावीच्या निर्णय पाठा संदर्भातील अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. त्याची वास्तविक उत्तरासह विविध उदाहरणं सरांनी दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या कु. गराटे मॅडम यांनी लेखक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर आहेत ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

या संदर्भात सुंदर असं मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुष्का कोलते आणि तन्मय बारेकर वर्ग दहावा या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन मीनल घोडमारे वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनीने केले. सदर कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये