ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अतिवृष्टी बाधितांना आर्थिक मदत त्वरित द्या

नायब तहसीलदारांना निवेदन ; आमरण उपोषणाचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना :- तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अद्यापही आर्थिक मदत मिळाली नाही. त्यामुळे ही आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी या मागणीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख प्रकाश खनके यांनी नायब तहसीलदार कोरपना यांना निवेदन दिले.

शासनाने दिवाळी अगोदर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊ असे जाहीर केले होते. त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली गेली.मात्र कोरपना तालुक्यातील गडचांदूर मंडळ वगळता कोरपना , नारंडा, नांदा या तिन्ही मंडळातील शेतकरी अद्यापही या मदतीपासून वंचित आहे. यंदा अतिवृष्टी मुळे शेतकरी वर्ग आधीच आर्थिक संकटात असताना मदत निधी लाही दोन महिन्याहून अधिकचा कालावधी लोटूनही विलंब होतो आहे.

परिणामी शेतकऱ्यांना मदत निधी मिळेल की नाही. यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. येत्या पंधरा दिवसात त्वरित आर्थिक मदत न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा यांनी निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. याप्रसंगी निवेदन देतेवेळी सुरेश खोबरकर, लक्ष्मण कोंगे, राकेश खोबरकर, पुंडलिक पावडे, मनोज गोरे, जितेंद्र निरांजने, खैरे आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये