बल्लारपूर येथे संताजी जगनाडे महाराजांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर :_ तेली समाजाचे आराध्य दैवत संत.श्री संताजी जगनाडे महाराज यांची ४०१ ‘वी’ जयंती सोमवार ८ डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली. पारंपारिक पद्धतीने दिंडीत लहान मुलांकडून साकारण्यात आलेल्या विविध संताच्या वेशभूषा,घोडे, पालखी, आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संताजी जगनाडे महाराजांची दिंडी संताजी भवन, गांधी चौक, महादेव मंदिर या मार्गावरून काढण्यात आली. दिंडी मिरवणुकीत शेगाव येथील वारकरी भजन मंडळीनी टाळ मृदंगाच्या स्वराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. आयोजित कार्यक्रमात मंडळाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पाहुण्यांचे भाषण, संताजीवरील पुस्तकाचे लोकार्पण आणि शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधवांनी उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही संत श्री. संताजी जगनाडे महाराजांची ४०१ ‘वी’ जयंती सोमवार ८ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी आयोजित मिरवणुकीत संताजी जगनाडे महाराजांची दिंडी (पालखी), घोडे, देखावे आणि लहान मुलांनी विविध संताच्या वेशभूषा साकारली. शेगाव येथील वारकरी भजन मंडळी या दिंडी मिरवणुकीची आकर्षण ठरली. टाळ मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. दिंडी नंतर संताजी भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.श्याम हिवरकर, कृष्णाजी गुल्हाने नगर अभियंता नगर परिषद बल्लारपूर, प्रा.डॉ. रवींद्र हजारे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन, मंडळाच्या माहिलांनी स्वागत गीत सदर करून पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश बेले, महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा.डॉ.भाग्यश्री रागीट (गवते) मॅडम, युवक मंडळाचे अध्यक्ष मोहित इटनकर, युवती मंडळाच्या उपाध्यक्षा कल्याणी पोहाणे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक भाषण मंडळाचे अध्यक्ष श्री मंगेश बेले यांनी केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन पर भाषण केले. यावेळी दहावी, बारावीसह इतर परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आणि विविध संताच्या वेशभूषा साकारणाऱ्या बजावणाऱ्या मुलांचा गुणगान करून त्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. रवींद्र हजारे यांनी संताजी जगनाडे महाराजांच्या जीवन चारित्र्यावरील पुस्तकाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ.वैष्णवी जुमडे व स्वाती बाभुलकर मॅडम, यांनी तर आभार प्रदर्शन पुष्पा गिरडकर यांनी केले. यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद वितरण करून झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे उपाध्यक्ष सुधाकर घुबडे, सचिव राजेश खनके, कोषाध्यक्ष मोहन कळंबे, सहसचिव अनिल ढोक, ज्ञानेश्वर कामडी, अँड. बंडू खनके, जयंत सुरकर, मधूकर शेंडे, चंद्रशेखर लिचोडे, विजय बाबुलकर, राजूभाऊ गवळी, किसनराव लोहबडे, संत. श्री संताजी महिला मंडळ, संत श्री.संताजी युवती मंडळ, संत श्री. संताजी युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



