बोधिसत्वास समर्पित आदरांजली कार्यक्रम संपन्न
अश्विन तावाडे मित्र परिवार आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भव्य “बोधिसत्वास आदरांजली कार्यक्रम” अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात अश्विन तावाडे मित्र परिवार यांच्या हस्ते बोधिसत्वांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर प्रबोधनात्मक संगीत कार्यक्रमाद्वारे बोधिसत्वांच्या विचारांचा संदेश संगीताच्या माध्यमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रबोधनकारांचे प्रेरणादायी सादरीकरण
प्रबोधनकारांनी आपल्या संगीत व विचारसंपन्न शब्दांद्वारे बोधिसत्वांना शब्दरूपी आदरांजली वाहिली. समाजपरिवर्तनाची दिशा कशी असावी, युवांनी कोणता मार्ग स्वीकारावा, समाजाची उन्नती कोणत्या विचारांवर आधारित असावी, यावर प्रभावी संदेशातून प्रकाश टाकण्यात आला.
मुख्य आयोजक अश्विन तावाडे यांचे अध्यक्षीय भाषण
या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, युवकांचे प्रेरणास्रोत व हिंगणघाट विधानसभा येथील तिसरे क्रमांकावर असलेले उमेदवार मा. अश्विन तावाडे यांनी आपल्या भाषणातून बोधिसत्वास अभिवादन करून समाजस्थितीवर थेट भाष्य केले.
आपल्या थेट व विद्रोही शैलीत त्यांनी पुढील मुद्दे मांडले :
“समाजातील उच्च शिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम व नोकरदार वर्गाने समाजाकडे दुर्लक्ष केले आहे.”
समाजातील विषमता, दोन गटातील आर्थिक दरी, आणि समानतेच्या तत्त्वांपासून झालेली दूरावस्था यावर त्यांनी जोरदार प्रश्न उपस्थित केला.
“ज्यांना बाबासाहेबांनी कमाईचा २०% समाजाला दान करायला सांगितलं— त्या वर्गाने आजपर्यंत काय योगदान दिलं?”
समाजाच्या उन्नतीसाठी आर्थिक योगदानाची आवश्यकता त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडली.
“समस्या सर्वांनी सांगितल्या, पण समाधान कोणीच दिलं नाही.”
गेल्या १०–१५ वर्षांत संविधान धोक्यात, आरक्षण संपणार, शिक्षण-आरोग्याचे खासगीकरण, युवक बेरोजगार… यासारख्या अनेक समस्या वाऱ्यासारख्या सांगितल्या गेल्या परंतु कोणतेही ठोस समाधान दिले गेले नाही, अशी त्यांनी टीका केली. आर्थिक क्रांतीचा संकल्प – “Economic Revolution Movement”
आपल्या भाषणात अश्विन तावाडे यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली—
“आर्थिक क्रांती मोर्चा” सुरू करण्याचा संकल्प
त्यांनी मांडले की —
समाजातील उच्च शिक्षित, व्यापारी व नोकरी वर्गातील फक्त ५,००० कुटुंबांनी प्रत्येकी १ लाख रुपये दिल्यास एक वर्षात ५० कोटींची भांडवली ताकद समाज उभी करू शकतो.
या रकमेतील उद्योजकता, रोजगारनिर्मिती, महिलांसाठी उद्योग, युवकांच्या करिअर निर्मितीसाठी नवीन कंपन्या उभ्या करता येतील.
SC घटकांसाठीच्या सरकारी योजनांचा योग्य लाभ घेऊन एक भक्कम, स्वावलंबी आंबेडकरी समाजव्यवस्था उभी करता येईल.
“२०२६ मध्ये याच दिवशी पूर्ण लेखाजोखा समाजासमोर ठेवेन”
असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी जाहीर केले—
“मी नामदेव ढसाळांचा छावा आहे.
*मी मुळद्याला चंदन लावणारा नाही तर*
*विचाराला वंदन करणारा विद्रोही आहे.!”*
“व्यवस्थेविरोधात बोलू काही” या भूमिकेतून समाजाची आर्थिक गुलामी संपवण्यासाठी आंदोलनाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
स्वावलंबी समाज हीच खरी आदरांजली
अश्विन तावाडे यांनी यावर विशेष भर दिला :
आपले शिक्षणसंस्था असाव्यात
आपले आरोग्य क्षेत्र असावे
आपले रोजगार क्षेत्र असावे
युवकांचे शोषण संपले पाहिजे
समाजाला भीक मागावी लागू नये
कार्यक्रम शांतपणे पार पडला
हिंगणघाट व परिसरातील युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोधिसत्वांच्या योगदानाला व विचारांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली..!



