ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विविध कार्यक्रमाने रघुवीर भैय्या अहीर यांचा वाढदिवस साजरा

आरोग्य शिबीर, रूग्णांना चष्मे वाटप, व अन्य सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीरभैय्या अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर महानगरात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांनी दि. 07 डिसेंबर 2025 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा केला.

            चंद्रपुरात भाजपा, भाजयुमो, व अन्य आघाड्यांच्या वतीने महाकाली मंदिर, हिंग्लाज भवानी माता मंदिर, अष्टभुजा मंदिर, विठ्ठल मंदिर वार्डातील गणपती मंदिर, टागोर शाळा येथील हनुमान मंदिर व बिनबा वार्डातील धनात्री नाग मंदिर येथे पुजा-अर्चना करून त्यांच्या दीर्घायुष्याकरिता महाआरती करून लाडू प्रसाद वाटप करण्यात आला. राष्ट्रवादी नगर, पंचशिल चौक व बाबुपेठ येथे आरोग्य व नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रूग्णांना शिबिर स्थळी चष्मे वाटप करण्यात आले. चंद्रपूर सामान्य रूग्णालयातील रूग्णांना फळ व ब्लॅकेटचे वाटप व राजुरा उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप आदी कार्यक्रम संपूर्ण दिवसभर आयोजित करण्यात आले.

            वरील सर्व कार्यक्रमास पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर, खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, व अन्य पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देवून आयोजकांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विनोद शेरकी, सुभाष आदमने, प्रदीप किरमे, राहुल सुर्यवंशी, मयुर भोकरे, राम हरणे, सुबोध चिकटे, अक्षय घोटेकर, शैलेश दिंडेवार, पराग मलोडे, अभिलाष मार्कंडवार, शुभम डफ, अंजया मातंगी, अभिनव कोरकोपुलवार यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये