ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भातील मराठी विषय शिक्षक अधिक कृतीशील कार्य करतात – प्रा. संपतराव गर्जे 

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा मराठी विषय शिक्षक महासंघ याद्वारे चंद्रपूर जिल्ह्यातील मराठी विषय शिक्षकांची आभासी सभा नुकतीच घेण्यात आली. या आभासी सभेला मार्गदर्शन करतात मराठी विषय शिक्षक महासंघाचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रा. संपतराव गर्जे यांनी विदर्भातील चंद्रपूर भूमीचे कौतुक करत चंद्रपुरातील मराठी विषय शिक्षक हे अधिक कृतिशील असल्याचे त्याचे कार्यातून निदर्शनास येते असे सांगितले .

आभासी सभेचे उद्घाटक मराठी विषय शिक्षक महासंघाचे संस्थापक राज्य सचिव बाळासाहेब माने तर सभेचे अध्यक्ष राज्य उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार हे उपस्थित होते. या आभासी सभेला प्रमुख अतिथी म्हणून राज्य कोषाध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे, प्राचार्य विजयाताई मने गडचिरोली, जिल्हा मार्गदर्शक प्राचार्य डॉ. सुधीर मोते, डॉ. विठ्ठल चौथाले गडचिरोली, डॉ . शालिनी तेलरांधे नागपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

मराठी विषय शिक्षकांच्या ऑनलाईन सभेमध्ये बोलतांना प्रा. संपतराव गर्जे म्हणाले की, मराठी शिकविणे म्हणजे फक्त भाषा शिकविणे नव्हे, तर मराठी शिक्षक म्हणजे संस्कृतीचे रक्षक, परंपरेचे वाहन, मूल्यांचे संवाहक आणि विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. आपण विदर्भातील मराठी विषय शिक्षक खरोखरच कृतिशील आहात. हे आपण राबवित असलेल्या विविध उपक्रमांतून दिसून येते, असे मत व्यक्त केले.

        या आभासी सभेचे उद्घाटक मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य सचिव प्रा. बाळासाहेब माने तर या सभेचे अध्यक्ष राज्य उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार हे होते. अतिथी म्हणून राज्य कोषाध्यक्ष प्रा. संजय लेनगुरे, भंडारा, प्राचार्य विजयाताई मने गडचिरोली, जिल्हा मार्गदर्शक प्राचार्य डॉ. सुधीर मोते, डॉ. विठ्ठल चौथाले, चामोर्शी, डॉ . शालिनी तेलरांधे, नागपूर, हे प्रामुख्याने उपस्थित होते.

 राज्य सचिव प्रा. बाळासाहेब माने यांनी मराठीला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण मराठी शिक्षकांनी संघटित राहून कार्य करण्याचे आवाहन केले. प्रा. डॉ. हटवार यांनी मराठी विषय शिक्षकांची भूमिका ही इतर विषय शिक्षकांपेक्षा अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक प्रभावी असल्याचे मत प्रतिपादन केले. याशिवाय विदर्भ साहित्य संघ नागपूर तर्फे राबविण्यात येत असलेल्या इयत्ता १२ वी मराठी विषयाच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले.

या आभासी सभेला यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रा. यशवंत पवार, अमरावतीचे प्रा. ओमप्रकाश ढोरे, अकोला येथील प्रा. संजय गोडे, गोंदिया येथील प्रा. पवन कटरे, प्रा. भेंडारकर, भद्रावती तालुकाध्यक्ष प्रा. स्वाती गुंडावार , चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गजानन सातपुते, प्राचार्य धर्मराज काळे, प्रा. संजय मुंडे उपाध्यक्ष, प्रा. महेश गेडाम शुभांगी मोहीतकर, उपस्थित होते. या या आभासी सभेला चंद्रपूर जिल्ह्यासह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती व अकोला जिल्ह्यातील मराठी विषय शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

या आभासी सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रा. नामदेव मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. महेश गेडाम यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. देविदास सालवटकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये