ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकतेचा विचार म्हणजेच हिंदुत्व – रामलाल जी

चांदा ब्लास्ट

            राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला २०२५ या वर्षात १०० वर्ष पूर्ण होत आहे. या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने भारताच्या जनजीवनात प्रत्येक क्षेत्राचे विशिष्ट महत्व आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील महत्वाच्या व्यक्तीशी चर्चा संवाद घडावा या दृष्टीने प्रमुख जन संगोष्ठी चे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, चंद्रपूर जिल्हा विचार मंच तर्फे दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ ला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या सभागृहात संपन्न झाले.

                  या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल जी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी आपली राष्ट्रीयता व पंचपरिवर्तन या प्रमुख विषयावर मार्गदर्शन झाले.रामलाल जी म्हणाले की, हा संपूर्ण समाज माझा आहे आम्ही कुठल्याही पद्धतीने विखुरलेले जाणार नाही याची काळजी भविष्यात आपल्याला करावी लागेल आणि हिंदु जीवनपद्धती आहे.

यामध्ये कुठल्याही ठराविक अशा पूजा पद्धतीचा विचार नाही तर प्रत्येकाला त्याचे स्वातंत्र्य आहे. या देशात राहणारा प्रत्येक नागरिक हिंदू आहे. आपले पूर्वज सुद्धा कोण होते याचा शोध घेतला तर तो मुळात हिंदुत्वापर्यंत पोहचतो म्हणून एकतेचा विचार म्हणजेच हिंदुत्व आहे व संपूर्ण समाजाने एक होऊन भारताला जगाचा नेतृत्व करण्यायोग्य बनविण्यासाठी प्रयत्नरत राहावे. “वसूदैवम् कुटुंबकम्” आणि “सर्वे भवन्तु सुखिनः” हा मंत्र भारत पुढील काळात संपूर्ण जगाला देण्यासाठी सक्षम ठरेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षात पंचपरिवर्तनातील स्वदेशी, सामाजिक समरसता, नागरिक शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण हे पाच बिंदु संपूर्ण समाजात रुजविण्यासाठी सज्जनशक्ती ला सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

            याकार्यक्रमात मंचावर विदर्भ प्रांत मा. संघचालक श्री दीपक तामशेट्टीवार, चंद्रपूर जिल्हा मा. संघचालक श्री तुषार देवपुजारी व चंद्रपूर जिल्हा विचार मंच संयोजक किशोर किरमिरे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, प्राध्यापक, उद्योजक, व्यापारी, सी.ए., डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विविध पंथातील नागरिक, मठ, मंदिर, विविध क्षेत्रातील नामवंत महिला इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये