ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
५२ हजाराच्या वर मतदार बजावणार मतदानाचा हक्क
निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज : भद्रावती नगरपरिषद निवडणूक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबरला होत असून त्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील ६३ मतदान केंद्रातून ५२,५७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात महिला मतदारांची संख्या २६ हजार ५५७ तर पुरुष मतदारांची संख्या २६ हजार १५ एवढी आहे.
शहरातील ३२ इमारतींमधून ६३ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी पोलींग बुथ पार्टी, राखीव पथक, झोनल ऑफिसर,कर्मचारी असे जवळपास ५०० कर्मचारी मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आले. आहे तीन डिसेंबरला शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.



