ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयातील शिक्षकांची जिल्हास्तरावर निवड 

पंचायत समिती सावलीद्वारा विविध स्पर्धांचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

शिक्षकांना त्यांची भाषिक आणि सादरीकरण कौशल्य वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती (शिक्षण विभाग) सावलीच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी तालुका स्तरावर विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात जिल्हा परिषद आणि खाजगी शाळेतील अनेक शिक्षकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला त्यात विश्वशांती विद्यालय सावली येथील चार शिक्षकांनी विविध स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.त्यात विद्यालयाचे शिक्षक धनंजय गुरनुले यांनी वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक,भुजंगराव आभारे यांनी फोटोग्राफी स्पर्धेत,राजू केदार यांनी कथा – कथन स्पर्धेत तर प्रवास वर्णन स्पर्धेत राजश्री बीडवई यांनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर आपली मजल मारली आहे.

जिल्हास्तरावर निवड झालेल्या शिक्षकांचे सावली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे,केंद्र प्रमुख लोमेश बोरेवार, भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली चे सर्व पदाधिकारी, शाळा समितीचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार, पर्यवेक्षक राजेश झोडे सर्व विद्यार्थी,पालक शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृदांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये