ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात जागतिक एड्स दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे दिनांक 1 डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ग्रामीण रुग्णालय कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे, गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, ग्रंथपाल प्रा. सचिन कर्णेवार, ग्रामीण रुग्णालय येथील समुपदेशक श्री. संजय जीवतोडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दिपाली वाढई, लिंक वर्कर रवींद्र भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

     आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अनिल मुसळे यांनी विद्यार्थ्यांना एड्स रोगाच्या गंभीरतेबद्दल मार्गदर्शन केले. जगात एड्स रोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून भारतातील एड्स रुग्णांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही एक अत्यंत धोकादायक बाब आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि एड्स रोगावर योग्य उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे असे मत डॉ. मुसळे यांनी व्यक्त केले.

      यानंतर एड्स जनजागृती करण्याकरिता विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी, महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांनी एड्स रुग्णाशी योग्य वर्तन करण्याबाबत शपथ घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संजय जीवतोडे, सूत्रसंचालन प्रा. सचिन कर्णेवार यांनी केले आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत पुराणिक यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक प्रा. नीलिमा बावणे, प्रा. नीता मुसळे, प्रा. संगीता बल्की, प्रा. वैशाली जमदाडे, प्रा. प्रकाश लालसरे, प्रा. घनश्याम बांगडे, प्रा. रत्नाकर बोभाटे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये