“स्थानिक गुन्हे शाखा, वर्धाची कारवाई आरोपी निष्पन्न करून बॅटऱ्या चोरीचा गुन्हा उघड”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 25/11/2025 रोजी फिर्यादी नामे भरत मोरेश्वर सावजी, रा. गणेश कॉलनी स्टेट बँक ट्रेझरी जवळ नागपूर रोड वर्धा यांचे मारुती कार वर्कशॉप नालवाडी वर्धा येथून अज्ञात चोरट्याने सात बॅटऱ्या चोरी करून नेल्याने फिर्यादीचे तक्रारी वरून पो.स्टे. रामनगर अप. क्रमांक 0976/25 कलम 303(2) बी. एन. एस. अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकास मुखबीर कडून माहिती मिळाली जुनापाणी चौक वर्धा येथे ऑटो चालक महादेव उर्फ मुस्तफा घनश्याम कोरे वय 38 वर्ष, रा. वडार झोपडपट्टी आर्वी नाका, वर्धा व पाच महिला, सर्व रा. वडार झोपडपट्टी आर्वी नाका, वर्धा ह्या एक बजाज कंपनीचा काळया रंगाच्या तीन चाकी ऑटो मध्ये मारुती कार वर्कशॉप नालवाडी वर्धा मधील चोरी केलेल्या बॅटऱ्या विकण्या करिता घेऊन जात आहेत अशा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ जुनापाणी चौक, वर्धा येथे नाकाबंदी करीत असता पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील मारुती कार वर्कशॉप नालवाडी वर्धा येथून चोरी केलेल्या बॅटऱ्या घेऊन जाणारा ऑटो दिसला त्यास शिताफिने ताब्यात घेऊन ऑटोतील महिला व ऑटो चालकास बॅटऱ्याबाबत विचारपूस केले असता उडवा उडवी चे उत्तरे देत असल्याने त्यांना बारकाईने अधिक विचारपूस केली असता बॅटऱ्या चोरीच्या असल्याबाबत सांगितले.
सदरच्या बॅटऱ्या ह्या चोरी करून आणल्याचे खात्री पटल्याने आम्ही पंचसमक्ष सदर महिला आरोपी व ऑटो चालक आरोपी यांच्या ताब्यातून 1) जुन्या वापरत्या 07 बॅटऱ्या किंमत 35,000 रू, 2) एक जुना वापरता बजाज कंपनीचा ऑटो क्र . एम एच 31 सीपी 4051 किंमत कि. 1,00,000 रू, *असा जु.कि. 1,35,000 रू चा मुद्देमाल* जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून सदर गुन्ह्यातील आरोपीतांना व बॅटऱ्या पुढील कारवाई करता ताब्यात घेऊन पो.स्टे. रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर हे करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. प्रकाश लसूनते, स.फौ. मनोज धात्रक, पो.हवा. हमीद शेख, पो.हवा. महादेव सानप,म.पो.हवा. पल्लवी बोबडे, पो.अ.विनोद कापसे, पो.अ मंगेश आदे, पो.अ. राहुल लुटे ,सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.*



