विशेष मोहीम अंतर्गत अवैद्य गावठी मोहा दारूच्या अड्ड्यावर पोलीसांची धडक कारवाई
लाखो रूपयाचा मुद्देमाल जप्त ; पो.स्टे. सावंगी मेघे, पोलीसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २९.११.२०२५ रोजी पोलीस स्टेशन सावंगी मेघे, जि. वर्धा पोलीसांनी अवैद्य दारू विकी आणि निर्मीती करणाऱ्या गुन्हेगाराविरुद्ध धडक मोहीम राबवीली. या विशेष मोहीमेअंतर्गत, गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन सावंगी मेघेच्या हद्दीत सुरू असलेल्या सावंगी आणि शिखवेडा येथे पोलीसांची पथके तयार करून अनेक गावठी मोहा दारूच्या भट्टयांवर छापे टाकण्यात आले.
या कारवाईत पोलीसांनी लाखो रूपयाचा मुद्देमाल जप्त केला असुन यामध्ये तयार केलेली गावठी मोहा दारू, हजारो लिटर कच्चा मोहा सडया आणि दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे रसायन, भांडी आणि ईतर साहीत्य असा एकूण २५,०२,१०० रू. मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सी.ए. परिक्षणाकरिता सॅम्पल वेगळे काढून उर्वरित मुद्दधेमाल नष्ट करण्यात आलेला आहे. सदर कारवाई मध्ये एकूण ०४ आरोपीविरुद्ध ०४ गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीची नावे ०१. बातिसिंग हसमुख सिंग, रा. शिखवेडा, सावंगी मेघे, ता.जि. वर्धा ०२. राजसिंग रूपसिंग खिच्ची, रा. शिखवेडा, सावंगी मेघे, ता.जि. वर्धा ०३. सुनिलसिंग बावरी, रा. शिखवेडा, ता.जि. वर्धा ०४. सबद अफसर नवी, रा. सुखकर्तानगरी, सावंगी मेघे, जि. वर्धा अशी असुन या कारवाईमुळे आरोपीमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
या कारवाईमुळे अवैद्य दारू निर्मीती करणाऱ्या आणि समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढवणाऱ्यावर मोठा वचक बसला आहे. या संदर्भात आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरू आहे:
सदरची कामगीरी मा. श्री. अनुराग जैन सा., पोलीस अधीक्षक जि. वर्धा. मा. श्री. सदाशिव वाघमारे सा.. अप्पर पोलीस अधिक्षक, जि. वर्धा, मा. श्री. प्रमोद मकेश्वर सा., उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग वर्धा यांचे मार्गदर्शनात सपोनी. पंकज वाघोडे ठाणेदार पो.स्टे. सावंगी जि. वर्धा, पो. उपनि, गोपाल शिदि. पो.उपनि. दुधाने, सफौ. विलास भेडे, ब.नं २०६, पो.हवा. खाडे ब.नं. ७५४, पोहवा. पंचभाई, ६५६, पो.हवा. निलेश. ब.नं. १२८५, पोहवा. विरेंद्र, ब.नं. ४८२, पो.शि. हर्षवर्धन ब.नं. ६९४ व महिला अंमलदार, मपोहवा. प्रगती ब.नं. १३४५यांनी केली आहे.



