आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राध्यापक भरती संथगतिने., संघर्ष समिती करणार सत्याग्रह व बेमुदत धरणे!

राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये २५३४ पदे मंजूर, यातील ११६६ पदे रिक्त

चांदा ब्लास्ट

प्राध्यापकांचा गुणवत्तापूर्ण सहभाग हा उच्चशिक्षणाच्या सर्व संस्थांच्या यशात सर्वात महत्त्वाचा घटक आहे तसेच सर्व शैक्षणिक प्रक्रियेचे ते आधारस्तंभ आहेत. राज्यामध्ये शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करणे, विशिष्ट कार्यक्रम विकसित करणे, शिक्षण आणि मूल्यमापन प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि विद्यार्थ्यांना समाजाचे जबाबदार सदस्य म्हणून विकसित करणे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे असते. राज्यातील सहाय्यक प्राध्यापक भरती 2012 पासून आर्थिक व आरक्षण धोरणामुळे संथ गतीने सुरु होती. शासन निर्णय दि. 03 नोव्हेंबर 2019 मुळे प्राध्यापक भरतीला गती मिळाली. सन 2017 मध्ये अशासकीय अनुदानित महाविद्यालये यामध्ये सहायक प्राध्यापकांची 31,185 पदे मंजूर यातील 8949 पदे रिक्त होती. 2017 च्या रिक्त पदांच्या 40 टक्के (3580 पदे) तसेच ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक यांची 100% भरती सुरु करण्यात आली आहे. तरी सुधा अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील आज या रिक्त पदांची संख्या दहा हजारांच्या पुढे गेली आहे.

अकृषी विद्यापीठे यामध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या मंजूर पदांच्या 80 % भरती करण्यास मंजुरी 7.8.2019 व 16.11.2022 रोजीच्या शासन निर्णयांनी दिली आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठांमध्ये 2534 पदे मंजूर यातील 1166 पदे आज ही रिक्त आहेत. सशक्त भारत व “विश्वगुरु बनवण्यासाठी गुरूंची म्हणजेच प्राध्यापकांची नेमणूक होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी साठी देखील कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता पडणार आहे.

परंतु शासनाकडून यासंदर्भात कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही शासनाचे या कृतीचा निषेध करण्यासाठी नेट सेट पीएचडी धारक संघर्ष समितीच्या वतीने सत्याग्रह चार व बेमुदत धरणे आंदोलन दिनांक 20 जुलै 2023 पासून पुणे येथील सहसंचालक उच्च शिक्षण यांचे कार्यालय येथे करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य समन्वयक डॉ. प्रमोद तांबे व अजय बनसोडे यांनी दिल

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये