श्री खंडोबा देवस्थान उत्सव सोहळा उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
झिंगुजी वॉर्ड भद्रावती येथे श्री खंडोबा उत्सव सोहळा ग्रामस्वच्छता, घटस्थापना, भजन तसेच विविध स्पर्धेच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.सुमारे सहा दिवस चाललेल्या या सोहळ्यात भाविक भक्तांनी घटस्थापना करून मल्हाळी स्तोत्राचे वाचन केले.
यामध्ये बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सर्व दिनी भाविकांनी परिसर स्वछ केला.यावेळी प्रगती महिला भजन मंडळ तसेच श्री संत नारायण बाबा भजन मंडळानी भजने गायली.विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्सान मिळावे म्हणून चित्रकला तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.सदर स्पर्धेत एकूण ४२ बालकांनी सहभाग घेतला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना माननीय मंडळीच्या हस्ते गौरवपत्र देण्यात आले.शेवटच्या दिवशी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कचरू बावणे,प्रल्हाद पारशिवे,भारत बावणे, विशाल दाते,प्रशांत लांडगे,अमित पढाल,प्रमोद बावणे, सुनील पढाल,विठ्ठल बावणे, रमेश नागपुरे,शंकर पढाल,भारत पोईनकर तसेच विवेकानंद महाविद्यालय येथील प्रा. अमोल ठाकरे सह आदींचे सहकार्य लाभले.



