ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर

२९ महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :– राज्य निवडणूक आयोगाने २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता मतदार यादी सुधारणा व प्रसिद्धी प्रक्रियेचा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना मतदार यादीतील हरकती व दुरुस्ती नोंदविण्यासाठी अधिक वेळ मिळावा, या उद्देशाने कार्यक्रमातील दिनांकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

निवडणूक कार्यक्रमातील सुधारित टप्पे ढीलप्रमाणे :

प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना स्वीकारण्याचा अंतिम दिनांक –

आधी निश्चित दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५

सुधारित जाहीर दिनांक : ३ डिसेंबर २०२५

प्राप्त हरकती/सूचनांवर निर्णय, अंतिम मतदार यादीचे अधिप्रमाणीकरण व प्रसिद्धी –

आधी निश्चित दिनांक : ५ डिसेंबर २०२५

सुधारित जाहीर दिनांक : १० डिसेंबर २०२५

 मतदान केंद्र ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे –

 आधी निश्चित दिनांक : ८ डिसेंबर २०२५

 सुधारित जाहीर दिनांक : १५ डिसेंबर २०२५

मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर करणे –

 आधी निश्चित दिनांक : १२ डिसेंबर २०२५

 सुधारित जाहीर दिनांक : २२ डिसेंबर २०२५

   सदर कार्यक्रमानुसार, सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशीलातील दुरुस्ती, तसेच हरकती/सूचना आवश्यक पुराव्यासह मुख्य महानगरपालिका कार्यालयात कार्यालयीन वेळेत, लेखी स्वरूपात विहित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यासाठी मतदार यादी अचूक व अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादी सुधारणा प्रक्रियेस सहकार्य करावे, असे मनपातर्फे सूचित करण्यात आले आहे. हा सुधारित कार्यक्रम राज्य निवडणुक आयोग यांच्या निर्देशानुसार अमलात आणण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये