ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संविधान दिनानिमित्त सावित्रीबाई फुले क. महाविद्यालय, गडचांदूर येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारतीय संविधानाच्या ७६ व्या स्वीकारदिनानिमित्त सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘भारतीय संविधानाच्या रक्षणार्थ युवकांची भूमिका’ या विषयावर कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. कनिष्ठ महाविद्यालयांतील १२ स्पर्धकांनी यात उत्स्फूर्तपणे भाग घेतला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. महेंद्रकुमार ताकसांडे होते.

प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य श्री. धर्मराज काळे व सेवानिवृत्त शिक्षक श्री. पद्माकर खैरे यांची उपस्थिती लाभली.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. महेंद्रकुमार ताकसांडे यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करीत म्हटले की, “संविधान हे केवळ कायद्यांचा संग्रह नव्हे, तर ते आपल्या देशाचे प्राणतत्त्व आहे. त्याचे रक्षण करणे ही आजच्या युवकांची सर्वोच्च जबाबदारी आहे.या स्पर्धेमध्ये

प्रथम क्रमांक : कु. तनु अशोक सावरकर(वर्ग१२वा विज्ञान)

द्वितीय क्रमांक : कु नयन रघुनाथ चव्हाण (वर्ग१२वा विज्ञान)

तृतीय क्रमांक : कु. पूजा बळीराम राठोड (वर्ग१२वा विज्ञान)यांनी पटकाविला.

             परीक्षक श्री. धर्मराज काळे व श्री. पद्माकर खैरे यांनी स्पर्धकांच्या सखोल आकलनाचे व प्रभावी सादरीकरनाचे कौतुक केले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सोज्वल ताकसांडे यांनी केले तर आभार प्रा. अशोक सातारकर यांनी मानले.

  स्पर्धेला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संविधान दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेने युवकांमध्ये संविधानाच्या मूल्यांबद्दल जागरूकता व आदर निर्माण झाल्याचे सर्वांनी नमूद केले.

   कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा जहिर सय्यद,प्रा दिनकर झाडे, प्रा नितीन सुरपाम, प्रा जयश्री ताजने, प्रा. राजेश बोळे, प्रा. नितीन टेकाडे, प्रा. अनिल मेहरकुरे, प्रा शिल्पा ताजने, प्रा प्रविण डफाडे,करण लोणारे, सीताराम पिंपळशेंडे व विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये