आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,लखमापूर येथे शालेय मंत्रिमंडळ स्थापन

उमेदवारी अर्ज १६ विद्यार्थ्यांनी दाखल केले त्यापैकी ११ विद्यार्थ्यांचा मंत्रिमंडळात समावेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे 15 जुलैला मतदान जनजागृती साठी शालेय मंत्री मंडळ स्थाप करण्यात आले.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांना लोकशाही बद्दल माहिती देण्यात आली. व आपल्या राज्याचा देशाचा जिल्ह्याचा कारभार आपण निवडून दिलेल्या पदाधिकाऱ्यातून कशा प्रकारे पार पाडल्या जातो. याबद्दलची संपूर्ण माहिती देन्यात आली.

  विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आले.

 त्यानंतर दोन दिवसाचा प्रचार केल्या. नंतर दिनांक 15 जुलै 2023 रोजी प्रत्यक्ष गुप्त मतदान करून निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.मतदान पद्धती संपूर्णपणे समजण्यासाठी विद्यार्थ्यांमधूनच निवडणुकीत अधिकारी नेमण्यात आले.

 मतदान कशाप्रकारे करायचं याबद्दल सर्व माहिती प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी अनुभवली.उमेदवारी अर्ज 16 विद्यार्थ्यांनी दाखल केले त्यापैकी 11 विद्यार्थ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलं.

यामध्ये शालेय मुख्यमंत्री कुं. ज्ञानदेवी उलमाले उपमुख्यमंत्री बाळकृष्ण वासाडे, मृणाल कैरासे, शिक्षण मंत्री कुजानवी भोजेकर, क्रीडामंत्री यश लांडे आरोग्य मंत्री सम्राट भोयर, सहकार मंत्री पियूष जूनघरे, सांस्कृतिक मंत्री रचना येटे, वनमंत्री अनुज पिंपळशेंडे,पाणीपुरवठा मंत्री लखन पारखी, परस बाग कृषी मंत्री कु.स्वरा कल्लारे

वरील प्रमाणे खाते वाटप करून शपथ विधी सोहळा घेण्यात आला.

या उपक्रमामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमधील सर्व शिक्षक वृंद सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये