ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छोटुभाई पटेल हायस्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट

छोटुभाई पटेल हायस्कूल, चंद्रपूर येथे आज दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकण्याने झाली.

डॉ. आंबेडकर यांनी भारतीय संविधान रचनेत दिलेले थोर योगदान, सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांसाठी केलेला संघर्ष याबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि लोकशाहीची ताकद यावर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक राजीव मानकर, पर्यवेक्षक निबाळकर सर, बारापात्रे सर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी संविधानाची प्रस्तावना सामूहिकरीत्या वाचून लोकशाही मूल्यांचे पालन करण्याची प्रतिज्ञा देखील केली.

शाळेत साजरा झालेला हा संविधान दिन विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर, लोकशाहीची जाण आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना निर्माण करणारा ठरला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये