महिला विद्यापीठात विद्यार्थिनींनी घेतली संविधान संरक्षणाची शपथ
संविधान दिनासह २६/११ च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली

चांदा ब्लास्ट
२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली व त्या स्मृतीत दरवर्षी संविधान दिवस साजरा केला जातो.एस एन डी टी महिला विद्यापीठ मुंबईचे बल्लारपूर आवारातही राष्ट्रीय सेवा योजना विभागा अंतर्गत संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमांत सर्व विद्यार्थिनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी संविधानाचे पालन,आदर व संरक्षणाची शपथ घेतली.
या प्रसंगी आवाराचे संचालक डॉ राजेश इंगोले यांनी विद्यार्थ्यांना संविधान व लोकशाही करिता त्याचे पालन किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. सहायक कुलसचिव डॉ बाळू राठोड यांनी संविधानाची ऐतिहासिक पृष्ठभूमि समजावून सांगितली तर समन्वयक डॉ.वेदानंद अलमस्त यांनी आपल्या मार्गदर्शनातून नागरिकांच्या मौलिक कर्तव्याची जाणीव करून दिली.
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधानासह मुंबई हल्ल्यासाठीही स्मरण केला जातो .२००८ साली याच दिवशी मुंबईतील विविध ठिकाणी आतंकवादी हल्ले झाले होते. हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जीवहानी झाली. त्या प्रसंगी शहिद झालेल्या सर्व हुतात्म्यांना विद्यापीठाद्वारे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. या प्रसंगी आवाराचे संचालक डॉ राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड व समन्वयक डॉ वेदानंद अलमस्त, रासेयो कार्यक्रम अधिकारी सह प्रा.श्रुतिका राऊत,सर्व विद्यार्थिनी,प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.



