संविधानाचा सन्मान हा प्रत्येक नागरिकाचा सन्मान — डॉ. मंगेश गुलवाडे

चांदा ब्लास्ट
भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त चंद्रपूर महानगरात भव्य “संविधान सन्मान रॅली” चे आयोजन करण्यात आले. भारतीय लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांना अभिवादन करण्यासाठी शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्साहाने सहभागी होत लोकशाहीचा शक्तीशाली संदेश दिला.
या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपूरचे महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे यांनी विशेष सहभाग नोंदविला. संविधानातील समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “संविधानाचा सन्मान हा प्रत्येक नागरिकाचा सन्मान आहे” असे प्रतिपादन करत त्यांनी सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय एकता आणि लोकशाही बळकटीसाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहन केले.
तसेच आंबेडकर चौक येथील भारतरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार पण सह राष्ट्रीय गीत व संविधानाचे प्रास्तादिकतेची उपस्थित सर्व नागरिकांना प्रतिज्ञा देऊन रॅली ची सुरुवात करण्यात आली
रॅलीमध्ये नम्रता ठेमसकर आचार्य रामपाल सिंग, प्रज्वलंत कडू,हनुमान काकडे, धम्मप्रकाश भोसले वंदना जांभुळकर यश बांगडे रवी लोणकर, संदीप आगलावे बी. बी. सिंग, सोमेश्वर नंदनवार आणि उमेश आष्टणकर यांचीही लक्षणीय उपस्थिती होती. सर्व मान्यवरांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व भव्य झाला.
संविधानाच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित ही रॅली नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणारी आणि लोकशाहीचे मूल्य दृढ करणारी ठरली. शहरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



