आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मोतीबिंदू निर्मूलनाचा ऐतिहासिक उपक्रम!
बल्लारपूर मतदार संघातील ५३२ रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

चांदा ब्लास्ट
रुग्णांनी मानले आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
बल्लारपूर :_ राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर विधानसभेत राबविण्यात आलेल्या भव्य मोतीबिंदू तपासणी व उपचार मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये ४,००० नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी दृष्टीवर गंभीर परिणाम झालेल्या ५३२ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रिया पार पडल्यावर रुग्णांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.
तीन महिन्यांत बल्लारपूर मतदारसंघातील गावागावांत आठवड्यातील शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये ४,००० नागरिकांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५३२ रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ५३२ रुग्णांवर शालिनीताई मेघे रुग्णालय, वानाडोंगरी, नागपूर येथे पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णांसाठी प्रवास, निवास आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था देखील मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
बल्लारपूर मतदारसंघात एकही मोतीबिंदू रुग्ण उपचाराविना राहू नये, हा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा दृढनिश्चय आहे. यानुसार, जानेवारी २०२६ पासून या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू होत असून बल्लारपूर मतदारसंघातील गावागावांत पुन्हा मोफत तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. अनेकांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, “आ. मुनगंटीवार यांच्यामुळे फक्त दृष्टी नव्हे… तर जगण्याचा आत्मविश्वास परत मिळाला.” या उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू खुलले आहे आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची नवी सुरुवात झाली आहे, अश्याही भावना व्यक्त होत आहेत.
जनतेसाठी निःस्वार्थ धडपड
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून आयोजित विविध आरोग्य शिबिरांमधून तब्बल ३५ हजार नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर १५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली आहे, हे विशेष.



