ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घुग्घुस शहर में चुनावी सरगर्मी के बीच विकास कार्य ठप — नागरिक बेहाल

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (जि. चंद्रपुर) — नगर परिषद चुनाव 2025 के वातावरणात शहरातील विविध विकासकामे कासवगतीने चालत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषत: प्रभाग क्रमांक 03 मधील पाइपलाइन दुरुस्ती व नवीन पाइपलाइन कनेक्शनचे काम धिम्या गतीने सुरू असल्यामुळे अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. यामुळे रहिवाशांनी पाण्यासाठी तगमग सहन करावी लागत आहे.

फक्त पाणीपुरवठाच नव्हे, तर चालू कामामुळे रस्त्यांची परिस्थितीही खराब झाली असून नागरिकांना दररोजच्या ये-जा करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्ते उखडलेले असल्याने वाहनधारकांचे हाल होत असून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वर्ग त्रस्त आहेत.

दरम्यान, घुग्घुस नगर परिषद निवडणूक समीप आल्याने अनेक अधिकारी निवडणुकांच्या कामामध्ये गुंतलेले आहेत. परिणामी, सुरू असलेली कामे नियोजित वेगाने पूर्ण होत नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली आहे. “कामे वेळेत होत नाहीत, पाणी मिळत नाही, रस्ते खराब — या सर्व समस्यांकडे नेते आणि संबंधित अधिकारी कधी लक्ष देणार?” असा प्रश्न स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

निवडणूक रणधुमाळीत नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामे पूर्ण गतीने करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये