ब्रम्हपुरी शहराजवळ असलेल्या बोरगाव येथे इथेनॉल प्रकल्पात मोठा स्फोट
स्फोटानंतर प्रकल्पात लागली आग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- येथे नव्यानेच सुरू झालेल्या इथेनॉल या कंपनीमध्ये आज दुपारी ४.३० च्या सुमारास आग लागली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सदरील ठिकाणी इथेनॉलचा साठा असल्याचे म्हटले जात आहे. त्या ठिकाणच्या डिस्टेन्शन प्लांटला टेस्टिंग सुरू असताना आग लागली असल्याची चर्चा आहे.
घटनास्थळी ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व मूल येथील फायर ब्रिगेड ला बोलाविण्यात आले आहेत, तसेच गडचिरोली जिल्ह्यातून दोन फायर ब्रिगेड वडसा येथून सुद्धा फायर ब्रिगेड बोलाविण्यात आल्या.
तसेच महानगरपालिका चंद्रपूर येथील दोन फायर टेंडर फोम solution सोबत रवाना करण्यात आलेले आहेत.
सध्या कोणतेही जीवित हानी ची नोंद नाही.
आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नाही , प्राथमिक प्रतिसाद पथक प्रकल्पात दाखल झाले असून या स्फोटात दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली, लगतच्या झिलबोडी- बोरगाव- उदापूर या 3 गावात नागरिक हादरा बसल्याने भयभीत झाले, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून पुढील तपास सुरू आहे.



