जिल्हा पोलीस अधीक्षक, यांनी देऊळगाव राजा येथे केली स्ट्राँग रूमची पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक महोदयांनी सार्वत्रिक निवडणूक -2025 करिता नगरपरिषद देऊळगाव राजा येथे स्थापन करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रत्यक्ष पाहणी 19 नोव्हेंबर रोजी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान स्ट्रॉंग रूम परिसरातील त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, प्रवेश नियंत्रण नोंदवही, CCTV निरीक्षण प्रणाली, 24×7 सुरक्षा पथक यांची सविस्तर तपासणी करण्यात आली.
तसेच स्ट्रॉंग रूम परिसरातील फायर सेफ्टी, बॅरिकेटिंग, प्रकाशव्यवस्था आणि निवडणुकीसंबंधित संवेदनशील साहित्याच्या सुरक्षेबाबतही निर्देश देण्यात आले.
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक महोदयांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुरक्षितता आणि शिस्तबद्धता काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या.
या पाहणीदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच नगरपरिषद प्रशासन उपस्थित होते.
सदर पाहणीत सुरक्षा व्यवस्था समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले असून, आगामी निवडणूक प्रक्रियेत कुठलीही सुरक्षाविषयक तडजोड होणार नाही, असे आश्वासन पोलीस विभागाकडून देण्यात आले.



