ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मद्यपानमुक्त समाजासाठी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसची जनजागरण सभा २० नोव्हेंबरला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       मद्यपानाच्या व्यसनातून मुक्त समाज उभारण्याच्या उद्देशाने वरोरा-भद्रावती-चिमुर आंतरसमूहाच्यावतीने भद्रावतीत जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सायं. ६ ते ८ या वेळेत नाग मंदिराजवळील लोकमान्य विद्यालयाच्या परिसरात ही सभा होणार आहे. वाढत्या मद्यव्यसनामुळे कुटुंबे आणि समाजामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकून त्यावर प्रभावी उपाय सुचविण्याचा या सभेचा हेतू आहे.

या दरम्यान ‘अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’चे सदस्य स्वतःच्या अनुभवांच्या आधारे मद्यपान हा आजार असून योग्य मार्गदर्शन आणि सहकार्याद्वारे त्यावर मात करता येते, याबाबत जनतेला प्रेरित करतील. तसेच कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या मानसिक तणावाबाबत माहिती देऊन व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत कुटुंबाची भूमिका कशी महत्त्वाची असते, यावर मार्गदर्शन करतील.

अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस ही संस्था जगभरात व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर सर्व अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमस बांधवांनी, त्यांच्या कुटूंबियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये