ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

जामखेड यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास – माजी मंत्री वडेट्टीवार

ब्रम्हपुरी येथे पंचायतराज सशक्तीकरण कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

देशाच्या विकासात गावाची भुमिका फार महत्वाची आहे. गावाचा विकास होईल तेव्हाच देशाचा विकास झाला असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी गावांमधील सामाजिक व आर्थिक व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. गावविकासात ग्रामपंचायतीची भुमिका फार महत्वाची आहे. मोगलांनी सुध्दा ग्रामपंचायतीला केंद्रबिंदू मानून आपला कारभार चालवत होते. गावाला एवढ सुजलाम सुफलाम बनवा कि शहराला देखील हेवा वाटावा. आदर्श गावाची संकल्पना मांडतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गावाला तिर्थस्थळ म्हटल आहे. त्यामुळे गावाच्या विकासासाठी झपाटुन काम करा असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.
ब्रम्हपूरी येथील दिव्यदिप बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमप्रसंगी मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून दिव्यदिप बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा डॉ.स्निग्धा कांबळे, गटविकास अधिकारी संजय पुरी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे हे उपस्थित होते.
पुढे बोलतांना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, तुमच्या गावात तुम्ही केलेल्या विकासकामांमुळे तुमच्या गावाचा विकास झाला तर तुमची नवी ओळख समाजात निर्माण होईल. त्यामुळे महाराष्ट्रातील शेवटच्या माणसापर्यंत तुमचं नाव जाईल. काम करत असतांना विरोध हा होईल मात्र चांगलं काम करणाऱ्या व्यक्तिच्या पाठीमागे एक दिवस सगळे जण उभे राहतातच त्यामुळे चांगलं काम करणे तुम्ही सोडु नका असे उद्देशून त्यांनी कार्यक्रमप्रसंगी उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांना सांगितले.
सदर कार्यक्रमाला बहुसंख्येने विविध गावांतील सरपंच, ग्रामसेवक व नागरिक उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये