माजी नगरसेवक तथा सभापती महेश भर्रे यांचे निधन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी नगर परिषदचे माजी नियोजन सभापती तथा नगरसेवक, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, लोकसेवेत नेहमी तत्पर असणारे,वार्डातील दिलदार व्यक्तिमत्व असलेले व पेठ वार्ड येथील रहिवासी व नगर परिषद ब्रम्हपुरीचे माजी नगरसेवक तथा माजी सभापती महेशभाऊ चंद्रभान भर्रे(५२) यांचे आज दि.१९/११/२०२५ सकाळी ८: १५वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यावर अंत्यविधी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान स्मशानभूमी भूतीनाला येथे करण्यात आले.
त्यांच्या प्राच्यत्य पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ व बहीण असा आप्त परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. पेठ वार्ड, नागेश्वर नगर, किष्णा कॉलनी, फुले नगर, स्टेट बँक कॉलनी, ऑरेंज सिटी वॉर्डातील सामाजिक कार्यकर्ता, एक चांगला नगरसेवक गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.



