ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
देऊळगाव राजा नगर परिषद निवडणूक अध्यक्ष पदासाठी 15 तर नगरसेवक पदासाठी 159 अर्ज पात्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा नगर परिषद निवडणूक मध्ये अध्यक्ष पदासाठी एकूण 23 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते मात्र छाननी दरम्यान 8 अर्ज अपात्र झाले असल्याने आता 15 अर्ज पात्र ठरले आहेत.
21 नगर सेवक पदासाठी 168अर्ज दाखल करण्यात आले होते , छाननी दरम्यान 9 उमेदवाराचे अर्ज अपात्र ठरले आहेत त्यामुळे आता 159 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 21 नोव्हेंबर असून किती उमेदवार अर्ज मागे घेतात याकडे लक्ष लागले आहे, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे, उमेदवारांच्या अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी थोरात व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डोंगरजाळ यांनी केली, यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार उपस्थित होते.



