अवैधरित्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर रेतीसह जप्त
2 आरोपीतावर गुन्हा दाखल वाहतूक शाखेची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
आ सर. दि 18/11/25 रोजी मा पोलीस अधीक्षक सा श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशानवये आर्वी नाका परिसरात आर्वी नाका परिसरात वाहतूक पोलिसांची नाकाबंदी चालू असताना वाहतूक शाखेकडून नाकाबंदी चालू असताना ट्रॅक्टर नंबर MH 32AJ 0478 आणि ट्राली नंबर MH 32 P 5017 यामध्ये अडीच ब्रास रेती अवैधरीत्या बिना परवाना वाहतूक करताना मिळून आले त्यातील चालक 1) श्रावण रघुनाथ नेहारे वय 45 रा उमरी मेघे 2 ) क्लीन्नर नाव गोवर्धन महादेव राऊत वय 35 रा पिंपरी मेघे यांना सदर रेती वाहतूक करणे चे TP पास रेती वाहतूक परवाना मागणी केली असता त्यांच्या जवळ कोणताही रेती वाहतुकीचा पास परवाना हे मिळून आलेला नाही त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये अडीच ब्रास रेती 4 फावडे 4 घमेंले असा 7.16.400 रुपयांचा मुद्देमाल रेती बिना रॉयल्टी सह वाहतूक करताना मिळून आले त्यामुळे चालकाविरुद्ध व क्लीन्नर विरुद्ध पो. स्टे. रामनगर येथे रेती चोरी चा गुन्हा दाखल करण्यात आला, सदर कार्यवाही हि पोलीस निरीक्षक विलास पाटील, सहाय्यक फोजदार मंगेश येळणे पो हवा, आशिष देशमुख किशोर पाटील यांनी केली.
पो. नि. वाहतूक शाखा.



