ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
आत्महत्याग्रस्त व पुरग्रस्त/विजेने ने मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी भारतीय जैन संघटनेचे निवेदन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर जिल्हातील आत्महत्याग्रस्त, तसेच भीषण पुरात मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनासाठी भारतीय जैन संघटने तर्फे आज जिल्हाधिकारी विनय गोंडा सर यांना निवेदन सादर करण्यात आले.
या वेळी भारतीय जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष महेंद्र मंडलेचा, जिल्हाध्यक्ष द्विपेंद्र पारख आणि जिल्हा समन्वयक दीक्षांत बेले उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक यादी दोन दिवसांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत सकारात्मक प्रतिसाद दिला.



