चकपिरंजी ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या मासिक सभेत बसण्याची परवानगी
सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांच्या पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
ग्रामपंचायत अधिनियमाचा अभ्यास करून पंचायत समिती, सावली येथे पत्र दिलेला होता सदर पत्र पुढील कारवाई करिता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,चंद्रपूर त्यांच्याकडे देण्यात आलेला होता.
जिल्हा परिषद,चंद्रपूर येथे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी सतत पाठपुरावा केलं व ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी अधिकाऱ्यांना समजावून सांगितलं व शासन परिपत्रक व इतर जिल्हा परिषदेचा आदेश लक्षात आणून दिल्याने ग्रामपंचायतच्या मासिकसभेत बसण्याची परवानगी देण्याकरिता उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कडून गटविकास अधिकारी पंचायत समिती सावली यांना पत्र दिलेला आहे. आता त्यामुळे मासिक सभेत पारदर्शकता व मासिक सभेत विषय नघेता आपल्या मनमानी कारभाराने घेत असलेल्या ठरावावर आता पारदर्शकता दिसेल, जनतेनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे मासिक सभेत समोसे व चहा प्यासाठी जातात कि गावातील समस्या मांडण्यासाठी जातात.
हे स्वतःता नागरिकांना मासिक सभेत उपस्थित राहून बघायला मिळणार आहे. या आदेशामुळे मासिक सभेत उपस्थित न राहता दुसऱ्या महिन्याच्या मासिक सभेत मागील महिन्यातील स्वाक्षरी करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे चांगलेच धाबे दणाणले आहे. या निर्णयाबद्दल व पाठपुरा बद्दल चकपिरंजी गावातील नागरिकांनी कौतुक केले आहे.



