ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूरचा मान उंचावणारी कामगिरी!

जितेंद्र जोगड यांना राज्यपालांच्या हस्ते ‘उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष’ पुरस्कार

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ जिल्ह्याचे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जोगड यांना ‘महाराष्ट्र राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हाध्यक्ष’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजस्थानचे राज्यपाल मा. श्री हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पंढरपूर येथे झालेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या राज्य शिखर अधिवेशनात हा सन्मान जितेन्द्र जोगड यांना मिळाला.

या प्रसंगी उद्योजक व समाजसेवक राणा सूर्यवंशी, इस्कॉन प्रकल्प प्रमुख प. पू. प्रल्हाद दास, अमेरिकेचे श्रीकृष्ण चैतन्य महाराज, व्हॉइस ऑफ मीडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय आवटे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, सरचिटणीस डॉ. दिगंबर महाले यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असताना श्री. जोगड यांनी शासन, समाज, पर्यावरण, स्थानिक प्रश्न आणि लोकहिताशी संबंधित विषय सातत्याने मांडले. ठोस बातम्या, जनहित लेख, सामाजिक आंदोलनांतील सहभाग, व शासन वृतपत्र जाहिरात दरवाढीसाठी केलेली चळवळ, धरने, निवेदन ही त्यांची कार्यशैली विशेष उल्लेखनीय ठरली.

शासन जाहिरात दरवाढीसाठी धरने, निवेदनें आणि पत्रकार चळवळींमध्ये सहभाग

संपादक, प्रकाशक व सामान्य जनतेच्या समस्या शासन दरबारात प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न

प्रशासनिक व मार्गदर्शनात्मक कार्य

श्री. जोगड यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र मालक व संपादकांना RNI च्या नव्या नियमांची माहिती दिली.

Annual Statement भरताना आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य

प्रेस कायदा 2023 मधील महत्त्वाच्या कायदेशीर बाबींबाबत मार्गदर्शन

दोन वर्षांपासून वृतपत्र जाहिरात बिल थकीत असल्याने वृत्तपत्र मालकांचे थकित बिल शासनाकडे सातत्याने निवेदन करून पेमेंट तातडीने मंजूर करण्यासाठी निवेदनद्वारे मागणी केली आहे.

कार्यशाळा व बैठकींतून संपादकांना कायदेशीर जागरूकता

पत्रकारिता क्षेत्रात शिस्तबद्धता निर्माण करण्यासाठी सक्रीय प्रयत्न

समाज, शासन, पर्यावरण, पत्रकार संघटना आणि संपादकीय क्षेत्रातील जनजागृती अभियान ही त्यांची ओळख बनली आहे.

> “पत्रकारिता हा माझा व्यवसाय नाही; समाज आणि शासन यांच्यातील पारदर्शक सेतू म्हणून सत्य आणि जनतेचा आवाज पोहोचवणे हे माझे ध्येय आहे,”

असे जितेन्द्र जोगड यांनी सांगितले.

राज्यस्तरीय निवड समितीने त्यांच्या सर्वांगीण कार्याचा सखोल विचार करून या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्ह्यात तसेच राज्यभरातून त्यांचे जोरदार अभिनंदन करण्यात येत आहे.

या प्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटी, प्रदेश उपाध्यक्ष संजय पडोले, अनिल बालसराफ, जीतेन्द्र चोरडिया, आशीष रैच, कृष्णा कुमार, सुरेश डांगे, विनोद बोदले, बबलू राय, सुरेंद्र चौहान, राजेश रेवते, धनराज शेखावत, अनिल पाटिल, श्रीधर सतपुते, जावेद शेख, नरेश निकुरे, अरुण वासलवार, रविन्द्र बोकारे, गणेश रहिक्रवार, मनोहर दोत्पल्ली, विठ्ठल आवले, आशीष घूमे, रामकुमार चिचपाले, गणेश बेले, चेतन लूथरे, सारथी ठाकुर इत्यादींनी जोगड यांच्या सत्काराबद्दल हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.

जिल्ह्यातून तसेच राज्यभरातून सतत शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये