ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे दिनांक 15 नोव्हेंबर रोजी शनिवार ला जननायक श्री बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक श्री विजय डाहूले,पर्यवेक्षिका माधुरी मस्की,जयंती उत्सव समितीच्या प्रमुख नंदा भोयर उपस्थित होत्या.

बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी कु तनुश्री हस्ते, कु योगिता ढाकणे,कु नेहा बोढे,कु प्रतिज्ञा भोयर,कु श्रुतिका बोढाले, कु नंदिनी रॉय विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनाविषयी आपले विचार मांडले तसेच श्री धुर्वे सर,कु. मयुरी माकोडे मॅडम यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापक श्री मेश्राम यांनी बिरसा मुंडा यांच्या सामाजिक जीवनात घडलेल्या विविध गोष्टी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.

विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा यांची वेशभूषा व गीतांच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावी चा विद्यार्थी समय पारखी व कु आकाशी शेख यांनी केले आभार प्रदर्शन कु समीक्षा नवले हिने केले. याप्रसंगी सर्व शिक्षक,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये