ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूरचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा दृढ संकल्प – आ. सुधीर मुनगंटीवार

बल्लारपूर नगराध्यक्ष पदासाठी रेणुकाताई दुधे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

चांदा ब्लास्ट

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत अर्ज सादर

भाजप उमेदवारांच्या नामांकनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

बल्लारपूरमध्ये मागील काही वर्षांत अनेक विकासकामे राबविण्यात आली आहेत. आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, नुकतेच ₹३६ कोटी ७० लाखांच्या निधीतून अत्याधुनिक न्यायालयीन इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत असल्यामुळे बल्लारपूरचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे, असा निर्धार राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रेणुका दुधे यांचा बल्लारपूर नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केला.

आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर नगराध्यक्ष पदासाठी भाजपाच्या अधिकृत उमेदवार रेणुकाताई दुधे यांनी आज दुपारी १ वाजता बल्लारपूर नगरपरिषदेतील निवडणूक कक्षात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रक्रियेस आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अर्ज दाखल करताना स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगराध्यक्ष पदासाठी रेणुकाताई दुधे यांचा उमेदवारी अर्ज उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्याकडे सादर करण्यात आला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,शहराध्यक्ष रणंजय सिंह, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ तसेच तहसीलदार रेणुका कोकाटे, उपस्थित होते

या प्रसंगी बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले,बल्लारपूरमध्ये मागील काही वर्षांत विकासाची गती लक्षणीयरीत्या वाढली आहे. बल्लारपूरचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा मानस आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण,क्रीडा आणि न्यायव्यवस्था या सर्व क्षेत्रांत ठोस कामे करण्यात आली आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत मोठ्या प्रमाणात विनामूल्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच ₹३६ कोटी ७० लाखांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या आधुनिक न्यायालयीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले, ज्यामुळे बल्लारपूरच्या न्यायव्यवस्थेला नवीन उंची मिळणार आहे.”

पुढे आ.मुनगंटीवार म्हणाले,केंद्र आणि राज्य या दोन्ही स्तरांवर भाजपचे सरकार असल्यामुळे समन्वय, निर्णयप्रक्रिया आणि निधी उपलब्धता अधिक वेगाने होत आहे. त्यामुळे बल्लारपूरचा सर्वांगीण विकास अधिक योजनाबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने पुढे न्यायचा आमचा संकल्प आहे. नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणे हेच आमचे ध्येय असून, त्यासाठी भविष्यातही विकासकामांची ही मालिका अधिक गतीने सुरू राहील,असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

यावेळी बल्लारपूर नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून रेणुकाताई दुधे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरसेवकसाठी भाजपा उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक-1 (अ गटाचे) उमेदवार सौ. रेखा रमेश तोडसाम, (ब गट) लखनसिंह साधुसिंह चंदेल, प्रभाग क्रमांक-2 (अ गट) श्री. मोहित आनंद डंगोरे, (ब गट) सौ. शुभांगी सचिन जाधव, प्रभाग क्रमांक-3 (अ गट) पप्पू परमानंद गेडाम, (ब गट) कल्पना अरुण वाघमारे, प्रभाग क्रमांक-4 (अ गट) कावेरी जंपाली हरकावत, (ब गट) महेंद्र ओमप्रकाश ढोके, प्रभाग क्रमांक-5 (अ गट) ओमप्रकाश मुनेश्वर प्रसाद, (ब गट) सौ. दीपमाला प्रमोद यादव, प्रभाग क्रमांक-6 (अ गट) जयश्री किशोर मोहूर्ले, (ब गट) स्वामी राजू रायबरम, प्रभाग क्रमांक-7 (अ गट) पुष्पा अशोक देवईकर, ( ब गट) अजय त्रिलोकनाथ दुबे, प्रभाग क्रमांक-8 (अ गट) चौवंता सुरेश केशकर, ( ब गट) अब्दुल आबिद अब्दुल गफार शेख, प्रभाग क्रमांक-9 (अ गट) निलेश पांडुरंग खरबडे, ( ब गट) शुभांगी रमेश भेंडे, प्रभाग क्रमांक-10 (अ गट) अनिरूप गोवर्धन पाटील ( ब गट) अनिता राजकुमार गटलेवार, प्रभाग क्रमांक-11(अ गट) दिपाली अमित पाझारे ( ब गट) आलोक प्रेमचंद साळवे, प्रभाग क्रमांक-12(अ गट) नीरज कृष्णाराव झाडे ( ब गट) सुवर्णा अरुण भटारकर,प्रभाग क्रमांक-13(अ गट) सौ.शालू श्रीराम कुमरे ( ब गट) सौ.किरण साधूसिंह चंदेल, प्रभाग क्रमांक-14(अ गट)सौ. सारिका सतीश कणकम( ब गट) अजर युसुफ शेख, प्रभाग क्रमांक-15(अ गट) दिनेश बाळकृष्ण गोंदे( ब गट) सौ.ज्योती विलास आमटे, प्रभाग क्रमांक-16(अ गट) येलय्या मोंडया दासारफ(ब गट) सौ. वर्षा श्रीनिवास सुचूंवार, प्रभाग क्रमांक-17(अ गट) सौ. विद्या प्रकाश खरतड( ब गट) श्री. विश्वजीतसिंह चंदनसिंह चंदेल आदी उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये